मुंबई : प्रतिनिधी
रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर तीन जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आता नालासोपारा पोलिस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर तीन जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमधील येवल्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात, अहमदनगरमधील तोफखाना आणि संगमनेरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता नालासोपारा पोलिस ठाण्यातही रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी एका धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी महंत रामगिरी महाराज, सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्याविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
तसेच मुस्लिम धर्माविरुद्ध वादग्रस्त, बेछूट आणि बेताल वक्तव्य करून जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सरपणे समाजात तेढ निर्माण करून, जातीय दंगल घडविणे, मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने, बेकायदेशीररीत्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा-सुव्यवस्था निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिम एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अहमद युसूफ मेमन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.