21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीरामापूर येथील शेतातून २७ गांजाची झाडे जप्त

रामापूर येथील शेतातून २७ गांजाची झाडे जप्त

पालम : पालम तालुक्यातील मौजे रामापुर येथील रहिवासी असलेल्या संजय बाबूराव सुरनर यांच्या मालकीच्या असलेल्या बनवस शिवारातील गट नंबर ५८१मध्ये असलेल्या कपाशीमध्ये गांजाची झाडे आढळली आहेत. पोलिसांनी २७ गांजाची झाडे हस्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी सुरनर यांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांना गांजाच्या झाडा विषयी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, पोलीस हवालदार एस.पी.कोलमवाड बाबू शिंगनवाड, बळवंते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शहानिशा केली असता संबंधित शेतामध्ये गांजाची झाडे आली.

पोलीस निरीक्षक थोरात यांना कळवण्यात आले. पोलीस निरीक्षक थोरात, पोलीस उपनिरीक्षक के. एस. देवघरे यांनी शेतामध्ये असलेली २७ झाडे हस्तगत केली असून ज्याचे वजन १८ किलो ५०० ग्राम आहे. त्याची एकूण किंमत १ लाख ३ हजार रुपये आहे.

आरोपी संजय सुरनर यांना ताब्यात घेऊन पोलीस उपनिरीक्षक देवघरे यांचे फिर्यादीवरून पोलिस स्टेशन पालम येथे दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दोंकलवार हे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR