25.8 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeमनोरंजन‘रामोजी फिल्म सिटी’चे रामोजी राव यांचे निधन

‘रामोजी फिल्म सिटी’चे रामोजी राव यांचे निधन

मनोरंजन-मीडिया क्षेत्रात शोककळा पसरली

मुंबई : रामोजी फिल्म सिटी, ईनाडू मीडिया ग्रुपचे संस्थापक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते रामोजी राव यांचे निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे सांगण्यात येत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह बॉलिवूड-दक्षिणात्य कलाकारांनी आणि इतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार विजेते रामोजी राव यांचे आज सकाळी रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. ईनाडूशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, राव यांना ५ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे आज पहाटे ४.५० वाजता त्यांचे निधन झाले. राव यांचे पार्थिव शहराच्या बाहेरील रामोजी फिल्म सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू-मोदीनीं केला शोक व्यक्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवर पोस्ट करून रामोजी राव यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रामोजी राव यांच्या निधनाने भारताने मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील एक दिग्गज गमावला आहे. त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि हितचिंतकांना माझ्या सहवेदना. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, रामोजी राव यांनी पत्रकारिता आणि चित्रपट जगतात अमिट छाप सोडली आहे. रामोजी राव गरू यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. ते दूरदर्शी होते, ज्यांनी भारतीय माध्यमात क्रांती घडवून आणली, असे मोदींनी एक्सवर पोस्ट करून दु:ख व्यक्त केले.

मनोरंजन क्षेत्रातील या सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली
रामोजी राव यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. चिरंजीवी, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर ते व्यंकटेश दग्गुबती यांच्यासह अनेक कलाकारांनी आपले दु:ख व्यक्त केले. तर कंगना राणावत, विवेक अग्निहोत्री, राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR