मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित धर्मगुरुंनी प्रार्थना सादर केल्या.
महात्मा गांधी स्मारक समितीचे सचिव देवराज सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्य अतिथी आमदार अमिन पटेल यांनीही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महात्मा गांधी स्मारक समिती सदस्य सुमन पवार, प्रो. अमरसिंग यांच्यासह विद्यार्थी व नागरिक यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.