22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरराष्ट्रवादी प्रांतिक सदस्यपदी बाळराजे पाटील यांची निवड

राष्ट्रवादी प्रांतिक सदस्यपदी बाळराजे पाटील यांची निवड

मोहोळ –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) प्रांतिक सदस्यपदी लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील तर मोहोळ तालुकाध्यक्षपदी सलग पाचव्यांदा प्रकाश चवरे यांची निवड करण्यात आली.

पदाधिकारी निवडीत मोहोळ तालुक्यातील नऊ जणांची वर्णी लागली आहे. दरम्यान तालुका व शहर कार्याध्यक्ष पद हे नव्याने निर्माण केले आहे. जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या नुकत्याच नव्याने निवडी केल्या आहेत. त्यात मोहोळ तालुक्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. येत्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडी महत्वाच्या मानल्या जात आहेत.

लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांनी आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून तालुक्यातील रखडलेल्या आष्टी उपसा सिंचन योजना, अनगर व : दहा गावे उपसा सिंचन योजना तसेच विविध रस्ते यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नकेला आहे. तसेच युवकांना संघटित करून पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान आहे. अशा विविध कार्याची दखल घेत त्यांना प्रांतिक सदस्यपदाची संधी देण्यात आली आहे.

प्रकाश चवरे यांनी पक्षाच्या माध्यमातून गावोगावच्या नागरिकांच्या शासन दरबारी असलेल्या अडचणी सोडविणे, यासह पक्षहिताच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले आहे. याची दखल घेत त्यांची निवड झाली आहे. यासह कार्यकारिणी सदस्यपदी राजाभाऊ गुंड व राजाभाऊ आढेगावकर, बाळासाहेब भोसले तालुका कार्याध्यक्ष, रामराजे कदम तालुका कार्याध्यक्ष, भारत सुतकर तालुका विधानसभा अध्यक्ष, कुंदन धोत्रे शहराध्यक्ष, नागेश बिराजदार शहर कार्याध्यक्ष यांच्याही निवडी करण्यात आल्या आहेत. निवडीबद्दल आमदार माने, माजी आमदार राजन पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्यासह तालुक्यातील अन्य नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR