32 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeलातूरराष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी मुकेश हिरस

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी मुकेश हिरस

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी संजीवा रेड्डी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. कैलासभाऊ कदम, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पुणे येथे दि. १ एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याबैठकी दरम्यान संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते मुकेश हिरस यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी व दिपक मोहिते पाटील जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. मुकेश हिरस हे गेल्या अनेक वर्षापासून चळवळीत व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. संघटीत व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र इंटकच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, दिपक मोहीते पाटील व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. हिरस यांच्या निवडीबद्दल त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR