लातूर : प्रतिनिधी
चारित्र्यवंताशिवाय राष्ट्र पोरके ठरते. आज अशा चारित्र्यसंपन्न, राष्ट्रप्रेमी, सुजाण नागरिकांची देशाला असलेली गरज ओळखून व युवा व्यक्तिमत्व विकासाचा वसा घेऊन राष्ट्रीय सेवा योजना चळवळ म्हणून अहोरात्र कार्यरत आहे. ग्रामस्वछता, पर्यावरण संतुलन, व्यक्तिमत्व विकास, कृषि उन्नयन यासाठी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता कृषि महाविद्यालय, लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दर्जी बोरगाव येथे दि. २० मार्च ते २६ मार्च या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये शेतकरी मेळावा, महिला मेळावा, रक्तदान शिबीर, मुक्त विचारपीठ, शेतीपूरक व्यवसाय, पशुरोग निदान शिबीर, कृषि कवी संमेलन, व्यसनमुक्ती अभियान, माध्यम युवक-युवती सुसंवाद, ग्रामस्वच्छता ई. उपक्रम राबविण्यात आले.
या विशेष शिबिराचा समारोप २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, उदघाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य मधुकर गायकवाड, मार्गदर्शक म्हणून चिन्मयानंद स्वामी विद्यालयाचे अध्यक्ष संजय माने, प्रमुख अतिथी म्हणून गळीत धान्य संशोधन केंद्र प्रभारी डॉ. मोहन धुप्पे, दिलीप माने, देवणी गोपालक बच्चेसाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमास सुश्राव्य स्वागतगीताने सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे, सूत्रसंचालन कु. हर्षदा दाभाडे आणि शिवकुमार तांदळे तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. रमेश ढवळे यांनी मानले. यावेळी डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. विजय भामरे, डॉ. पद्माकर वाडीकर, डॉ. राजेश शेळके, डॉ. सारिका भालेराव, डॉ. महेंद्र दुधारे, डॉ. भास्कर आगलावे, डॉ. अनंत शिंदे, डॉ. दयानंद मोरे, डॉ. कुलदीप शर्मा, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. विनोद शिंदे, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. प्रभाकर अडसूळ, प्रा. भगवान कांबळे, डॉ. अजित पुरी, डॉ. विद्या हिंगे, डॉ. योगेश भगत, डॉ. संघर्ष शृंगारे, प्रा. सुधीर सूर्यवंशी, सुधीर सदर, राहुलदेव भवाळे, देविदास चामणिकर, प्रल्हाद जोंधळे, मीना साठे हे उपस्थित होते.