देवणी : बाळू तिपराळे
रासायनिक खतांच्या किमती आधीच असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ५० रुपयांपासून ते २४० ते २५५ रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
शेतकरी अगोदरच त्याच्या शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. वाढलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या शेतक-यांना आता नव्या वर्षात वाढणा-या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे शेतक-यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच आता वाढणा-या रासायनिक खतामुळे शेतक-यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे, हा प्रश्न शेतक-यांना सतावत असताना कसेबसे रब्बी हंगामात पेरणी केली. त्यातच ढगाळ वातावरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आता अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतक-यांनी शेतमालाची विक्री थांबवली होती मात्र उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढीव दरानुसार डीएपी खताची किंमत प्रत बॅग १ हजार ५९० रुपये झाली आहे तर १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १७२५ रुपयांवरून १७२५ रुपये होणार आहेत. वाढणार आहेत. या नवीन वर्षात सुरुवातीलाच शेतक-यांवर आर्थिक संकट आल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.