30.3 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeधाराशिवराहुरी येथून तुळजाभवानी देवीजींची पालखी तुळजापूरला प्रस्थान

राहुरी येथून तुळजाभवानी देवीजींची पालखी तुळजापूरला प्रस्थान

तुळजापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी राहुरी येथून सीमोलंघन सोहळ्यासाठी शुक्रवारी (दि.२०) श्री तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आली. माजी मंत्री आ शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते यावेळी श्री तुळजाभवानी देविंजींच्या पालखीची पूजन व आरती करण्यात आली.

पालखीचे मुख्य पुजारी व मानकारी सागर भगत, सुदाम भगत, ज्ञानेश्वर भगत, शिवराम भगत, दीपक भगत, देविदास भगत, संदीप भगत, निलेश भगत, मंगेश भगत, वसंत भगत, महेंद्र भगत, निखिल भगत, विशाल भगत ओम भगत, तसेच तेली समाजाचे अध्यक्ष संजय पन्हाळे, सुरेश धोत्रे, भाऊसाहेब इंगळे, चाचा तनपुरे, अण्णा शेटे, गणेश खैरे, सुरेश बनकर, नारायण घोंगडे, विक्रम तांबे, बाळूनाना बनकर, शरद येवले, सचिन म्हेत्रे सुभाष वराळे, उमेश शेळके, विक्रम भुजाडी, सुजय काळे, मकरंद कुलकर्णी, किरण भालेकर आदीची यावेळी उपस्थिती होती. देवीजींच्या सीमोलंघन सोहळ्यासाठी पालखी तयार करण्याचा व आण्यासाठी अनेक समाजाचा मान आहे. दरवर्षी पालखीसाठी लागणारे उभे लाकूड माळी, म्हेत्रे, इतर कामासाठी सागवान व बोरीचे लाकूड पालखीचे पटेल, गायत्री स्वामिलकडून घेतले जाते. खांद्यासाठी जो मोठा दांडा लागतो तो पूर्वीपासून जुनाच वापरला जातो. संपूर्ण लाकूड गोळ्या झाल्यानंतर ती पालखी तयार करण्याचा मान कै. उमाकांत सुतार घराण्याकडे असून सध्या त्यांचे वंशज अरुण सुतार हे मानकारी आहेत.

लाकडाची कताई करण्याचे काम धनगर समाजाचे भांड घराणे तर खिळे पट्टी करण्याचे काम हे लोहार समाजाचे रणसिंग घराण्याकडे आहे. संपूर्ण पालखी तयार झाल्यावर खन नारळांनी पालखीची ओटी भरून भंडारा उधळण करुन आई राजा उदो उदो करून या जय घोषात पालखी राहुरी येथून तुळजापूरला रवाना करण्यात येते. तुळजापूर येथील शुक्रवार पेठेत पलंग पालखी कट्ट्यावरती जानकोजी भगत यांच्या समाधी शेजारी आणण्यात येते. तेथे पलंग पालखीची पूजन झाल्यानंतर मंदिर संथानकडून मनाचा एक रुपया व नारळ देऊन सोमोलंघनासाठी आमंत्रण देण्यात येते. ही पालखी वाजत गाजत साधारण पहाटे ४ वाजेपर्यंत मंदिरात येते व या पालखीत देविंजिचा सीमोलंघन सोहळा संपन्न होतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR