22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeराष्ट्रीयराहुल गांधी संभलला निघाले; पोलिसांनी गाजीपूरमध्ये रोखले

राहुल गांधी संभलला निघाले; पोलिसांनी गाजीपूरमध्ये रोखले

 

लखनौ : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संभलला जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. गाजीपूर सीमेवर पोलिसांकडून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. राहुल गांधी बराच वेळ गाजीपूर सीमेवर पोलिसांशी बोलत होते. तब्बल दोन तास त्यांच्याशी वादविवाद केल्यानंतर शेवटी त्यांना दिल्लीला परतावे लागले.

राहुल गांधींसोबत असलेल्या काँग्रेस नेत्यांनाही पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. यावर प्रियांका गांधी यांनी संताप व्यक्त केला. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना राज्यघटनेत अधिकार दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारे त्यांना रोखता येऊ शकत नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

काँग्रेस नेते स्थानबद्ध : आज उत्तर प्रदेशच्या जनपद बुलंदशहरात पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना स्थानबद्ध केलं आहे. आज ४ डिसेंबर रोजी राहुल गांधी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह संभल येथे जाणार होते. यादरम्यान स्थानिक पोलिसांनी काँग्रेस नगर अध्यक्ष प्रशांत वाल्मिकी यांच्या घराबाहेर पहारा ठेवला आणि त्यांना हाऊस अरेस्ट केलं. काँग्रेस नेत्यांना घराबाहेर निघण्याची परवानगी नसल्याचीही माहिती आहे.

संभलचे जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. स्थानिक न्यायालयाने मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा आदेश दिला. यानंतर सर्व्हेक्षणासाठी टीम संभलच्या मशिदीत पोहोचली. यानंतर परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. काहींच्या मते मशीद तोडत असल्याची अफवा पसरल्यानंतर हिंसाचार बळावला. या हिंसक घटनेनंतर संभलमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या सर्व्हेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR