नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या मुलाचे नाव काय? या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. त्याच्या जन्मानंतर १५ दिवसांपर्यंत रोहित शर्मा आणि रितिका सजदेहच्या मुलाचे नाव अहान ठेवले असून पत्नी रतिकाने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा १५ नोव्हेंबरला दुस-यांदा बाबा झाला होता. रोहितची पत्नी रितिका हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने ख्रिसमसच्या थीमवर तिच्या मुलाचे नाव अहान असल्याचे सांगितले आहे.