रियल जीडीपी ७.८ टक्क्यांवर

रियल जीडीपी ८१.३६ लाख कोटींवर, आरबीआयच्या अंदाज दरापेक्षा वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. एप्रिल-जून २०२६ मध्ये देशाच्या रियल जीडीपीमध्ये ७.८ टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे देशांची रियल जीडीपी सुमारे ८१.३६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था आरबीआयच्या अंदाजित दरापेक्षा अधिक मजबूत राहिली. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जूनमध्ये जीडीपी ७.८ टक्के राहिला. आरबीआयचा अंदाज ७ टक्के होता. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत तो आकडा ६.९ टक्के दराने वाढला होता.

केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने सोमवारी हे आकडे जाहीर केले. २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ७.८ टक्के दराने वाढून ८१.३६ लाख कोटींवर पोहोचला. एक वर्षापूर्वी तो ७५.४६ लाख कोटी होता तर वास्तविक जीव्हीए ८.२ टक्क्याने वाढून ७३.८२ लाख कोटी राहिला. नाममात्र जीडीपी १०.३% ने वाढून ८८.२७ लाख कोटी नोंदवला गेला. गेल्या वर्षी तो ८० लाख कोटी होता. नाममात्र जीव्हीए ११.५% च्या वाढीसह ८०.५३ लाख कोटींपर्यंत पोहोचला.सामान्यत: ऊर्जेच्या वाढलेल्या किमती आणि महागाईमुळे आर्थिक व्यवहार मंदावतात. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेने या दबावाखालीही ७.८ टक्के वाढ नोंदवली.
निकालाआधी देशातील तमाम अर्थतज्ज्ञांनी जीडीपी वाढीबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले होते. मनीकंट्रोलच्या पोलमध्ये ७.३ टक्के वाढीचा अंदाज होता तर भारतीय रिझर्व्ह बँकेने ७ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला. रिवटर्सच्या सर्वेक्षणात हा आकडा ७.१ टक्के होता. एकंदरीत पहिल्या तिमाहीसाठी अर्थतज्ज्ञांचा अंदाज फार फार ७.५ टक्क्यांपेक्षा कमीच होता. परंतु याच काळात भारतीय अर्थव्यवस्थेने अर्थ तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा उत्तम कामगिरी केल्याचे दिसून येत आहे.

याचे श्रेय देशातील
कष्टकरी जनतेला
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी जीडीपी ग्रोथविषयी माहिती देताना देशाच्या अर्थव्यवस्थेने मजबूत कामगिरी करण्याचे प्रमुख श्रेय देशातील जनतेच्या कष्टाला जाते. तसेच एनडीए सरकारने केलेल्या सुधारणा आणि चपळ व्यवस्थापनेचे उत्तम परिणाम हे निकाल आहे. पुढील काळात देशातील नागरिकांसाठी असणा-या आर्थिक संधीत वाढ करण्यात सरकार नेहमी प्रयत्नशील असेल.

देशांतर्गत मागणी,
गुंतवणुकीचा परिणाम
मुळात, देशांतर्गत मागणी, गुंतवणुका तसेच सरकारी खर्च या गोष्टींनी या कठीण काळात अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला. देशात वाढते उत्पादन आणि फायनान्स सेवा देणा-या कंपन्यांच्या कामगिरीत सुधार अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणजे हा निकाल आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.

मागच्या तिमाहीच्या
तुलनेत मोठी घटच
गेल्या अर्थ वर्षातील शेवटच्या तिमाहीचा निकाल (जानेवारी-मार्च २०२६) पाहिला तर जीडीपी ग्रोथ ८.६ टक्के नोंदवण्यात आली होती. ही वाढ एप्रिल-जून २०२६ तिमाहीच्या तुलनेने नक्कीच अधिक आहे. परंतु गेल्या अर्थ वर्षातील पहिल्या तिमाहीच्या निकालापेक्षा यंदाच्या अर्थ वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला मानला जात आहे. गेल्या अर्थ वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.९ टक्के होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news