19.5 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्ररिलायन्सच्या वाढीचे श्रेय गुजरातला

रिलायन्सच्या वाढीचे श्रेय गुजरातला

मुकेश अंबानी, गुजरातमध्ये ७ लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
रिलायन्स समूहासाठी गुजरात हे शरीर, हृदय आणि आत्मा आहे, असे सांगत मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वाढीचे श्रेय गुजरातला दिले. तसेच भारताला कोणत्याही बा संकटापासून धोका नाही. कारण आपल्याकडे नरेंद्र मोदी नावाची अजेय भिंत असल्याचे अंबानी म्हणाले.

गुजरातमधील राजकोट येथे रविवारी झालेल्या पहिल्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत प्रमुख उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भाषण केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये ७ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. पंतप्रधान मोदींना सर्वात आदरणीय असे संबोधून त्यांनी रिलायन्ससाठी गुजरातचे महत्त्वही अधोरेखित केले. रिलायन्स गुजरातमध्ये ७ लाख कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करेल, असे अंबानी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बोलताना अंबानी यांनी दोन दशकांपूर्वी सुरू झालेल्या व्हायब्रंट शिखर परिषदेच्या प्रवासाची आठवणही करून दिली.
७ लाख कोटींची
विशाल गुंतवणूक
रिलायंस इंडस्ट्रीज पुढील ५ वर्षांत गुजरातमध्ये ७ लाख कोटी रुपयांचा गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. या गुंतवणुकीत स्वच्छ ऊर्जा, डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल सेवा आणि सामाजिक पायाभूत सुविधा यांचा समावेश असेल.

ग्रीन एनर्जी हब
जामनगर येथील सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन उर्वरक आणि पर्यावरणपूरक इंधनासह सर्वात मोठे ग्रीन एनर्जी एक्सपोर्ट हब बनवण्याचे लक्ष्य अंबानी यांनी सांगितले.

२४७ स्वच्छ वीज प्रकल्प
कच्छमध्ये चालणा-या मल्टी-गीगावाट सौर प्रकल्पाद्वारे पुरेसा स्वच्छ वीज पुरवठा सुनिश्चित केला जाईल, असेही मुकेश अंबानी स्पष्ट केले.

अक हब आणि आरोग्य सुविधा
जामनगरमध्ये अक-रेडी डेटा सेंटर उभारला जाईल आणि जागतिक दर्जाचे हॉस्पिटलही सुरू केले जाणार आहे.

ऑलिंपिक यशासाठी मदत
अंबानींच्या फाऊंडेशनद्वारे २०३६ चे ऑलिम्पिक यशस्वीरित्या होण्यासाठी गुजरात सरकारला सहकार्य केले जाईल आणि नवीन मल्टी-स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापनही रिलायन्स करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR