लातूर : विनोद उगिले
जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या पदाच्या भरतीला शासनाकडून देण्यात आलेली स्थागिती उठवण्यात आली, मात्र ही रेंगाळलेली भरती कधी होणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. पोलीस पाटील हे पद रिक्त असल्या मुळे जिल्ह्यातील अनेक गावातील कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. अखेर रेंगाळलेल्या पोलीस पाटील पद भरतीचा मार्ग अखेर मोक्ळा झाला असून जिल्ह्यातील लातूर उदगीर औसा-रेणापूर अहमदपूर व लिलंगा उपविभागीय अधिका-यांना अप्पर जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके यांनी सरळसेवा पध्दतीने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.
गावातील कायदा व सुव्यवस्था व महसूली माहिती वरिष्ठठांना देण्यासाठी ब्रिटिश काळापासून पोलीस पाटील हे पद अस्तित्वात असून, या पदाचे मोठे महत्व ग्रामीण भागात आजही कायम आहे. शिवाय या पदावर हे पद सांभाळत आहेत. आता या पदावर उचशिक्षित लोकांची परीक्षा देऊन नेमणूक केली जात आहे. पोलीस पाटील हे प्रत्येक गावात येणा-या अनोळखी व्यक्ती, विविध व्यावसायिक, नैसर्गिक आपत्ती असो किंवा करोना सारख्या महाभयंकर परस्थित शासनाचा गावापातळीवरील सर्वात शेवटचा घटक म्हणून सर्वात पुढे होऊन काम करणारा कोण तर पोलीस पाटील.
गावातील किरकोळ होणारे तंटे असोत की भावभावकीतील भांडणे असोत मिटवण्यासाठी या पदाचे मोठे महत्व आहे. शिवाय तंटामुक्त समितीमध्ये या पदाला महत्वाचे स्थान आहे. पोलीस पाटील हे गावातील विविध माहिती पोलीस ठाणे व तहसील कार्यालयाला त्यांच्या कडून गोपनीय पद्धतीने पुरविण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटील हे पद महसूली दप्तराला नोंद आहे. या पदाला गावापातळीवर पूर्वी पासून मोठे महत्व असल्या कारणाने गावा मध्ये पोलीस पाटील त्यांचा दबदबा असतो. या पदावर कामकारणा-या व्यक्तीला दर महिन्याला मानधन मिळते. आणि हे पदच जिल्ह्यातील बहुतांश गावात रिक्त असल्या कारणाने गावापातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत अडचणी येत आहेत.
तरी आता नवीन सरकार स्थापन झाले आहे. आता नवीन शासन तरी पोलीस पाटील पदाची रिक्त पदभरती करेल का? अशी चर्चा ग्रामीण भागात होत होत होती. अखेर पोलीस पाटील रिक्त पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ, लातूरच्या पाठपुराव्यानंतर अप्पर जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके यांनी सरळसेवा पध्दतीने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्ह्यातील लातूर उदगीर औसा-रेणापूर अहमदपूर व निलंगा उपविभागीय अधिका-यांना नुकतेच दिले आहेत.