29.7 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनरेखा म्हणजे ‘एव्हरग्रीन’सौंदर्य

रेखा म्हणजे ‘एव्हरग्रीन’सौंदर्य

व्हायरल फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री रेखा यांनी वयाच्या ७० व्या वर्षी नवे फोटोशूट केले आहे. गुलाबी रंगाच्या ‘अनारकली’ड्रेसमध्ये नववधूपेक्षा अधिक सुंदर दिसत आहेत. त्यांनी दागिन्यांसह हेवी मेक-अपही केला आहे. सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. रेखा यांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत. एका चाहत्याने तर रेखा म्हणजे ‘एव्हरग्रीन’सौंदर्य असे म्हटले आहे.

दरम्यान, ७०वर्षीय रेखा यांचे रूप आजच्या तरुण अभिनेत्रींना देखील फिके पाडणारे आहे. रेखा यांचे फोटो शेअर करताना फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी लिहिले, ‘मॅजेस्टिक, तेजस्वी आणि जबरदस्त रेखा जी. प्रत्येक फ्रेम तिची अतुलनीय आभा प्रतिबिंबित करते.

रेखा यांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत. रेखा यांचं वय वाढत नाही तर, कमी होतंय.. , अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रेखा म्हणजे एव्हरग्रीन सौंदर्य…’

रेखा यांचे फोटो पाहिल्यानंतर वय फक्त एक आकडा आहे… हे पुन्हा सिद्ध झाले आहे. रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. रेखा यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, रेखा आता बॉलिवूडपासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आजही चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR