27 C
Latur
Thursday, October 9, 2025
Homeलातूररेणापूर नगर पंचायत प्रभाग आरक्षण जाहीर

रेणापूर नगर पंचायत प्रभाग आरक्षण जाहीर

रेणापूर : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नियम २०२५ नुसार १७ प्रभागाचे प्रभागनिहाय आरक्षण बुधवारी दि. ८ येथील पंचायत समिती सभागृहात काढण्यात आले. रेणापूर नगर पंचायतीच्या अगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दि. ३ ऑक्टोबर २०२५ च्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रतिक लंबे यांची प्रमुख उपस्थिती होती

रेणापूर नगरपंचायतीच्या १७ प्रभागातील सदस्याचे आरक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील पहिली वर्गातील शौर्य व्यवहारे यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आले . त्यात प्रभाग १ सर्वसाधारण ,प्र .२ सर्वसाधारण महिला ,प्र . ३ सर्वसाधारण महिला ,प्र . ४ अनुसूचित जाती ,प्र .५ ना .मा . प्रवर्ग ,प्र . ६ ना . मा . प्रवर्ग महिला ,प्र . ७ सर्वसाधारण, प्र . ८ सर्वसाधारण महिला,प्र . ९ सर्वसाधारण महिला प्र . १० सर्वसाधारण महिला, प्र . ११ ना . मा . प्रवर्ग महिला, प्र . १२ ना. मा . प्रवर्ग ,प्र . १३ सर्वसाधारण ,प्र . १४ ना . मा . प्रवर्ग महिला ,प्र . १५ अनुसूचित जाती महिला ,प्र . १६ सर्वसाधारण ,प्र . १७ सर्वसाधारण साठी अरक्षित करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रदिप पाटील, ज्ञानदेव दहिफळे , लेखाधिकारी अमोल बाजुळगे , अकुंश फड, तलाठी दिलीप देवकते, स्वच्छता निरीक्षक महेमुद शेख, अकूंश गायकवाड विशाल इगे, बाबासाहेब भोसले, शिवराज कसबे , विशाल शिंदे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR