रेणापूर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. रेणा मध्यम प्रकल्प वगळता तालुक्यातील नदी-नाले सध्या कोरडे पडले आहेत. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून टंचाई असलेल्या गावात अधिगृहन करण्यास सुरुवात केली आहे . २१ गावांत २८ पाणी अधिग्रहणांची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर मोठे आहे.
तालुक्यात सरासरी ६८२.५ मिमी प्रत्यक्ष झालेला पाऊस ३६४.५ मिमी ५३.४ टक्के पडला आहे पावसाळा संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने नदी नाले आणखीन कोरडेच राहिले आहेत . त्यामुळे साठवण तलाव , पाझर तलाव हे पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत . रेणा मध्यम प्रकल्पात गतवर्षी पाणीसाठा शिल्लक आहे तोही केवळ २१.५० टक्के असल्याने प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या आदेश जिल्हाधिका-यांनी काढला आहे.
















