रेणापूर : प्रतिनिधी
श्री. रेणुकादेवी मंदिरात तीर्थक्षेत्र निधीतून दर्शन रांग बांधण्यात येत आहे या बांधकामासाठी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांतून निधी उपलब्ध झाला होता. हे बांधकाम सध्या पुर्णत्वाकडे आहे . देशमख यांच्या सूचनेवरून रेणापूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन अॅड. प्रमोद जाधव यांनी नुकतीच बांधकामाची पाहणी केली.
रेणापुर येथील ग्रामदैवत श्री. रेणुकादेवी मंदिर परिसर येथील लातूर ग्रामीणचे माजी आ. धिरज देशमुख यांच्या पुढाकारने तीर्थ क्षेत्र निधीतून दर्शन रांग सभागृह बांधकामसाठी मिळालेल्या निधीतून बांधकाम केले जात आहे. माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज देशमुख यांनी सदर बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्याच सूचनेप्रमाणे दर्शन रांग सभागृह बांधण्यात येत आहे.
हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नवरात्र महोत्सवात दूर दूरहून श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी येणा-या भावीकांची मोठी सोय होणार आहे. सर्वांना रांगेत उभे राहून दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती अॅड. प्रमोद जाधव यांनी देऊन उर्वरित बांधकाम लवकरच पूर्ण करू या दर्शन रांग सभागृहामुळे तालुक्यासह बाहेर गावाहून येणा-या भावी भक्तांची चांगली सोय होणार असल्याचे सांगितले.
यावेळी श्री. रेणुकादेवी ट्रस्टचे सचिव गुरूपद उटगे यांनी मंदिर सभागृह बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लातूर ग्रामीणचे माजी आ. धिरज देशमुख व माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचे श्री. रेणुकदेवी ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी श्री. रेणुकदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राम पाटील, ट्रस्टचे संचालक रमाकांत वाघमारे, ह.भ.प. गणपत महाराज दरोडे, सुभाष हाके, भुषण पनुरे, सचिन मोटेगावकर, शहरध्यक्ष विलासराव देशमुख युवा मंच सचिन पुंडलिकराव इगे, दत्ता जाधव, नितीन मोटेगावकर आदी उपस्थित होते.