28.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeलातूररेणुका रेसिडेन्सी प्रथम, कला स्फूर्ती क्लब द्वितीय

रेणुका रेसिडेन्सी प्रथम, कला स्फूर्ती क्लब द्वितीय

रेणापूर :  प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यात लोकनेते विलासराव देशमुख चंपीयनशिप क्रिकेट स्पर्धा चे  दि.१८ ते २ १ मे आयोजन करण्यात आले होते. यात २४  संघांनी सहभाग नोंदवला.रेणापूर येथील रेणुका  रेसीडेंसी क्लब रेणापूर  व कला स्फूर्ती क्रिकेट क्लब कामखेडा यांच्यात अंतिम सामना होऊन रेणुका रेसीडेसी क्लब प्रथम तर कला स्फूर्तीक्रिकेट क्लब हा संघ दुसरा आला या विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी दि २१ रोजी बक्षीस वितरण करण्यात आले.
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांसाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी १० ‘ या  स्पर्धेचे आश्रम शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. याल  रेणापूर तालुक्यातून २४ क्रिकेट संघानी सहभाग नोंदवला होता. मंगळवारी (दि २१) रेणुका रेसिडेंसी  किक्रेट क्लब  रेणापूर  व  कला स्फूर्ती  क्रिकेट क्लब कामखेड  या दोन्ही संघात  अंतिम सामना होऊन त्यात रेणुका रेसिडेसी  क्रिक्रेट क्लब रेणापूर  प्रथम आला.  या संघाला मान्यवरांच्या हस्ते ५१ हजार रुपये ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. द्वित्तीय आलेल्या कला स्फुर्ती क्रिकेट क्लब या संघाला ३१ हजार रुपये ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिडा रसिकांनी  षटकार, चौकार, विक्रेट घेणा-या बॉलरला वैयक्तिक रोख  बक्षीसे देण्यात आली. बक्षीस  कार्यक्रमास लातुर ग्रामीणचे  माजी आमदार त्र्यंबक भिसे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन यशवंतराव चव्हाण , जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष तथा  कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, माजी सभापती प्रदिप राठोड, बाळकृष्ण माने, सेवादल कॉग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष हनमंत पवार, कृउबाचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अँड शेषेराव हाके ,कृउबाचे संचालक कमलाकर  अकनगिरे, प्रविण  माने, अशोकर राठोड, विश्वनाथ कागले , रामंिलग जोगदंड ,बाळकृष्ण खटाळ ,पुजा इगे, प्रदिप काळे, अशादुल्ला सय्यद, अजय चक्रे आदी उपस्थित होते.  स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे  प्रमुख कमलाकर आकनगिरे , माजी सभापती प्रदिप राठोड, बाळासाहेब करमुडे , सचिन इगे,  बबलू वंगाटे, गणेश सौदागर,  धोडीराम राठोड, अल्लाउद्दीन बावचकर, राजू राठोड , शुभम राठोड यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR