रोटरी क्लबचा सायकल बँकेचा उद्घाटन सोहळा उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
रोटरी क्लब लातूरच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर येथे होतकरू विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक स्थापन करण्यात आली. याचे उद्घाटन रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, रोटरीचे अध्यक्ष जकीखान कायमखानी, सचिव विश्वनाथ निगुडगे याच्या हस्ते  झाले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गरजू, होतकरू मुलींना या सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, त्यासाठी वेळेचे नियोजन करावे. जुन्या काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी भरपूर कसरत करावी लागायची. शाळा, महाविद्यालयाचे दूर असायची. आजसारखी प्रवास व्यवस्था नसायची. चालत जावे लागायचे. आज आपल्याला रोटरी सारख्या संस्था मदत करण्यात पुढे आहेत. याचा आपल्या भविष्य बनविण्यासाठी उपयोग करून एक यशस्वी व्यक्ती व्हावे, असे आवाहन डॉ. मोतीपवळे यांनी केले.
रोटरीचे अध्यक्ष जकीखान कायमखानी म्हणाले, जीवनात सकारात्मक उद्देश हा खूप महत्वाचा आहे. आपल्या जीवनात ध्येय निश्चिती फार महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल यात शंका नाही. आपल्या गुरुजनांचा, आई-वडिलांचा नेहमी सन्मान करावा. रोटरी क्लब  लातूरच्या वतीने पहिल्यांदाच सायकल बँकेची संकल्पना अमलात आणली आहे.
ज्या संस्थेत गरीब, होतकरू विद्यार्थी लांबून प्रवास करतात. त्या महाविद्यालयांना नवीन सायकली घेऊन द्यायच्या. विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आपला कोर्स सुरू आहे तो पर्यंत ती वापरायच्या व नंतर त्या महाविद्यालयात जमा करायच्या. महाविद्यालयाने त्याची दुरूस्ती करून पुढे येणा-या विद्यार्थ्यांसाठी त्या वापरता येतील, याची सुविधा करायची. जेणेकरून त्या सायकलींचा पुरेपूर विद्यार्थ्यांना उपयोग करता येईल, असे रोटरीचे अध्यक्ष जकीखान कायमखानी म्हणाले.   या वेळी रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन अनिरुद्ध मुचलंबकर, मोहन परदेशीं, सुनील कोचेटा, हरिप्रसाद सोमाणी, सॅटेलाईट क्लबच्या अध्यक्ष कौशल्या सोनकवडे, वनिता लचुरिया सह सर्व रोटरियन तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापकांची उपस्थिती होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20

Latest news