टोकिओ : जपानमधील जन्मदर वाढवण्याचे मोठे संकट सध्या सरकारसमोर आहे. यामुळे सरकार विविध उपाययोजना राबवत जन्मदर वाढविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. यासाठी आता सरकार चार दिवसांचा आठवडा करणार आहे.
जन्मदर वाढविण्यासाठी जपान सरकारने चार दिवसांचा आठवडा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सु्ट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जन्मदर वाढविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं, हा या मागचा उद्देश आहे. म्हणजे सरकारने नागरिकांना रोमान्स करण्यासाठी वेळ देण्याचे नियोजन केले आहे. एप्रिल २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. यानुसार, मेट्रो सिटीमधील सरकारी कर्मचा-यांना आठवड्यातील फक्त चार दिवस काम करावे लागणार असून त्यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.
टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर करताना सांगितले की, एप्रिल २०२५ पासून मेट्रो शहरातील सरकारी कर्मचा-यांना दर आठवड्याला तीन दिवस सुट्टीचा पर्याय असेल.