25.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित-अजित पवारांची प्रीतीसंगमावर भेट

रोहित-अजित पवारांची प्रीतीसंगमावर भेट

सातारा : प्रतिनिधी
अजित पवार व रोहित पवार यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रीतीसंगमावर भेट झाली आहे. ही प्रीतीसंगमावरील भेट आणि संवाद राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये रोहित पवार यांना सल्ला देत कर्जत जामखेडच्या निकालावर भाष्य केले. तसेच रोहित पवार यांना खाली वाकून नमस्कार करायला लावला.

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधुम आता संपली आहे. लवकरच महायुतीकडून सत्ता स्थापन केली जाणार असून मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. २५ नाव्हेंबर रोजी रोहित पवार व अजित पवार यांची निवडणूक नंतर भेट झाली आहे. या भेटीवेळी काकाने पुतण्याला दिलेला सल्ला आणि टोला याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होत आहे.

आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री व सुसंस्कृत राजकारणाची मुहूर्तमेढ रोवणारे यशवंतराव चव्हाण यांचा २५ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांचे आशिर्वाद व स्मरण करण्यासाठी नेतेमंडळी कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर पोहचले होते. अजित पवार व शरद गटाचे आमदार रोहित पवार समोरासमोर आले.

यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून सांगितले की, ये ये..दर्शन घे काकांचे, असे अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले. रोहित पवार यांनी देखील काकांना खाली वाकून नमस्कार केला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार यांनी रोहित पवार यांना म्हणाले की, थोडक्यात वाचला ढाण्या… माझी सभा झाली असती तर काय झाले असते…असे अजित पवार म्हणाले. यानंतर हसून दोघेही नेते गेले. मात्र या खास भेटीची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.

दोघांच्या विचारांमध्ये भिन्नता
आमदार रोहित पवार म्हणाले की, ते माझे काका आहेत म्हणून पाया पडलो. आतातरी विचारांमध्ये भिन्नता आहे, शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तीच्या पाया पडणे माझी जबाबदारी आहे. २०१९ च्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या स्मृतिठिकाणावर भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणे महत्त्वाचे आहे तेच आम्ही केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR