रोहित यादव याच्यावर बीसीसीआयने केली कारवाई; २ वर्षांची घातली बंदी

मुंबई : प्रतिनिधी
बीसीसीआयने वय चोरी प्रकरणी मोठी कारवाई केली असून बंगालच्या लेग स्पिनरवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. रोहित यादव याच्या नावावर तीन वेगवेगळे जन्म दाखले मिळाले आहेत. यात २००७, २००९ आणि २०१० या वर्षाच्या जन्म दाखल्यांचा समावेश आहे. त्याच्या कागदपत्रांत विसंगती आढळून आल्यामुळे त्याला एज ग्रुप क्रिकेट खेळण्यास अयोग्य मानले गेले आहे.

रोहित नुकतेच भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा भाग राहिला आहे. त्याने जुलैमध्ये श्रीलंका दौ-यावर भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यात रोहित यादवची मोलाची भूमिका होती. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणा-या १९ वर्षाखालील मालिकेसाठी देखील भारतीय संघात निवड झाली होती. ही मालिका राजकोटमध्ये या महिन्यापासून सुरू होणार आहे.

मात्र श्रीलंका दौ-यावेळी त्याच्या कागदपत्रांच्या पडताळणीत मोठी गडबड समोर आली होती. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की वयाबाबतच्या कागदपत्रात गोंधळ आढळल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

रोहित मूळचा उत्तर प्रदेशचा
रोहित हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून खेळतो. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये त्याने आपले जन्म साल हे २००७ नोंदवले आहे. मात्र आधार कार्डच्या रेकॉर्डवर त्याचे जन्म वर्ष वेगवेगळे आढळून आले आहे. २०१७ आणि २०२० मध्ये अपडेट केल्या गेलेल्या आधार रेकॉर्डमध्ये त्याचे जन्म वर्ष हे २००६ नोंदवले गेले. त्यानंतर २०२१ मध्ये ते बदलून २००९ करण्यात आले.

हे प्रकरण त्यावेळी उजेडात आले ज्यावेळी सीएबीने रोहितला आपल्या ज्युनिर टीममधून बाहेर काढले. त्यानंतर याबाबत बीसीसीआयला माहिती देण्यात आली, आता बोर्डने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर त्याच्यावर २ वर्षांची बंदी घातली आहे. सर्व संबंधित राज्यांना याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे.

सीएबीने ६२ खेळाडूंवर केली कारवाई
वय चोरी प्रकरणी कारवाई होणारा रोहित यादव एकमेव खेळाडू नाही. सीएबीने कागदपत्रांच्या आणि वयाच्या बाबतीतील विसंगती आढळल्यामुळे एकूण ६२ खेळाडूंवर कारवाई केली आहे. २०२६-२७ आणि २०२७-२८ च्या सीझनमध्ये त्यांना कोणत्याही स्पर्धेसाठी नोंदणी किंवा ट्रान्सफरसाठी त्यांना अयोग्य घोषित करण्यात आले आहे.

या यादीत भारताकडून २०२२ मध्ये १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये खेळलेला वेगवान गोलंदाज रवि कुमार याचे देखील नाव सामील आहे. सीएबीच्या रेकॉर्डनुसार त्याच्या ख-या वयात ४५ महिन्यांचे अंतर आढळून आले आहे. तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल भट्टी देखील या यादीत असून त्याने तीन प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. तर दोन ए लिस्ट सामने देखील खेळले आहेत.
सीएबीने वयासंदर्भातील कागदपत्रे तपासून या खेळाडूंची यादी आपल्या वेबसाईटवर टाकली आहे. या कारवाईनंतर बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटना आता ज्युनियर क्रिकेटमधील वय चोरीबाबत गंभीर असून कडक भूमिका घेत आहे हे दिसून येते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल रात्रीचे बातमीपत्र 03.09.26
22:04
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 03.09.26
28:03
Video thumbnail
BIG BREAKING | वसमतमध्ये २८८ आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; उपविभागीय कार्यालयासमोर अंत्यसंस्कार
01:02
Video thumbnail
BIG BREAKING | जांब बुद्रुकमध्ये कडकडीत बंद, नांदेड–बिदर महामार्गावर रास्ता रोको
00:54
Video thumbnail
BIG BREAKING | तुळजापूर–नळदुर्ग मार्ग रोखला; मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन
00:53
Video thumbnail
BREAKING | जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लातूरमधील शाळा-महाविद्यालये बंद
02:46
Video thumbnail
BIG BREAKING | औशात मराठा बांधव आक्रमक; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
02:52
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल दुपारचे बातमीपत्र 03.09.26
16:47
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक; चार तालुके बंद, उद्या संपूर्ण जिल्हा बंद
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | मराठ्यांनी लातूरची मुख्य बाजारपेठ केली कडकडीत बंद; गंज गोलाईत शुकशुकाट
04:25

Latest news