15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeक्रीडारोहित-विराटचे वादळ, सिडनीत ७ नवे विक्रम

रोहित-विराटचे वादळ, सिडनीत ७ नवे विक्रम

सिडनी : वृत्तसंस्था
भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिस-या वनडेत ९ विकेटने विजय मिळवला. या वनडेमध्ये रोहित शर्माने शतक झळकावले तर विराट कोहलीने अर्धशतक केले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नाबाद १६८ धावांच्या भागिदारीने भारताने हा दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा १२१ धावा आणि विराट कोहली ७४ धावा करून नाबाद राहिला. विराट आणि रोहितच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने २३७ धावांचा पाठलाग ६९ बॉल शिल्लक असताना केला. या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करताना ७ रेकॉर्ड मोडले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतके केली. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नववे शतक केले तर विराट कोहलीच्या नावावर ८ शतकांची नोंद असून तो दुस-या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्माने ४५ शतके केली. सचिन तेंडुलकरच्या नावावरदेखील ४५ शतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवर म्हणून सर्वाधिक शतकांची नोंद डेविड वॉर्नरच्या नावावर असून त्याने ४९ शतके केली आहेत.

विराट कोहली वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना ५० पेक्षा अधिक धावा सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू ठरला. विराट कोहलीने ७० वेळा अशी खेळी केली आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने ६९ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅच खेळण्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. विराट आणि रोहित शर्माने एकत्र ३९१ वी आंतरराष्ट्रीय मॅच खेळली.

रोहित-विराट जोडीची
१९ वेळा मोठी भागिदारी
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी एकदिवसीय सामन्यात १९ वेळा १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. १०० हून अधिक धावाची भागीदारी करण्याबाबत रोहित शर्मा आता तिलकरत्ने दिलशान-कुमार संगकारा (२०), सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली यांनी २६ वेळा शतकी भागीदारी केली.

विराट सर्वाधिक धावा
करणारा दुसरा खेळाडू
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. विराट कोहलीने ७४ धावांची खेळी करत कुमार संगकारा याला मागे टाकले आहे. कुमार संगकाराच्या नावावर १४२३४ धावा तर १४२५५ धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर १८४२६ धावांची नोंद आहे.

रोहितच्या नावावर
५० शतकांची नोंद
रोहित शर्माच्या नावावर कसोटी, वनडे आणि टी-२० मिळून ५० शतकांची नोंद आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० तर विराट कोहलीच्या नावावर ८२ शतकांची नोंद आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR