मुंबई : ओबीसी आंदोलन हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. मात्र, गुरुवारी गिरगाव चौपटी येथे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त मिळत नसल्याच्या कारणाने जलसमाधीचे आंदोलन करत असताना हाके यांची अजित पवारांनावर टीका करत असताना जीभ घसरली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी माध्यमांच्या समोरच अजित पवारांना उद्देशून शिवीगाळ केली.
हा अजित पवार आमच्या पोरांना शिकून देत नाही. हरामखोर आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही. मराठा विद्यार्थ्यांना, सारथीला निधी दिला जातो पण महाज्योतीला निधी दिला जात नाही. ओबीसी मुलांवर अन्याय केला जातो असे हाके म्हणाले. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे ओबीसींच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नसल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गिरीगाव चौपाटीवर हाके आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनासाठी लक्ष्मण हाके हे समुद्रात खोलपर्यंत गेले. भरतीची वेळ असल्याने अपघात घडण्याचा धोका होता.
पोलिसांनी धोका ओळखवून आंदोलन करणा-यांना ताब्यात घेतले. समुद्रातून हाके यांना उचलून पोलिसांनी बाहेर काढले. त्यांना गाडीत बसवत असताना त्यांनी अजित पवारांच्या विरोधात शिवीगाळ केली.