वडीगोद्री (जालना) : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारसोबत चर्चेसाठी आपले कोणतेही शिष्टमंडळ जाणार नसल्याचे सांगितले आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी ओबीसीबाबत आपण १२ कोटी जनतेच प्रतिनिधित्व करत आहोत. या भावनेने वागावे असा सल्ला हाके यांनी सरकारला दिला आहे. आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी गेल्या सहा दिवसांपासून हाके व वाघमारे आमरण उपोषण करत आहे. उपोषणाचा आजचा सहावा आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळाने येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळाने आपण चर्चेसाठी यावे असे मत व्यक्त केले या दरम्यान, आमचे शिष्टमंडळ पाठवू असे हाके यांनी सांगितले होते.
मात्र, वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने सरकारसोबत चर्चेसाठी कोणतेही शिष्टमंडळ जाणार नसल्याचा निर्णय घेतला. यामुळे आमचे शिष्ट मंडळ चर्चेसाठी जाणार नाही, असे हाके यांनी सांगितले. आमचे हक्क आणि अधिकार कसे बाधीत होत नाही, हे शासनाने सांगावे साधी सिंपल लाईन आहे. आमची पहिल्या दिवसापासून अशी मागणी आहे असे हाके यांनी सांगितले.