26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरलक्ष्मी अर्बन बँकेस राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

लक्ष्मी अर्बन बँकेस राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

लातूर : प्रतिनिधी
सहकार व बँकिंग क्षेत्रात उत्तमपणे दर्जेदार सेवा देणा-या सहकारी बँकेस देण्यात येणा-या राष्ट्रीय स्तरावरील मानाचा बेस्ट डिजिटल पेमेंट बँक २०२४ प्रथम पुरस्कार लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर बँकेस दिनांक २३ ऑगस्ट रोजी हॉटेल सहारा स्टार, मुंबई, येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत एनएएफसीयुबीचे चेअरमन लक्ष्मीदास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी यांना उत्कृष्ट स्पीकर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. लक्ष्मीकांत सोमाणी यांनी सहकार चळवळ, नागरी सहकारी बँका समोरील आव्हाने, व नागरी सहकारी बँकाचे योगदान याबाबत राष्ट्रीय परिषदेत स्पीकर म्हणून विस्तृतपणे मत मांडले. बँकेस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल व्हाईस चेअरमन सतिश भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे व सभासद, ग्राहकांनी बँकेच्या विविध डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR