लखनौ : वृत्तसंस्था
अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील ४० व्या सामन्यात यजमान लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय साकारला. लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. लखनौने दिल्लीला विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे आव्हान १३ बॉलआधी २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिल्लीने १७.५ ओव्हरमध्ये १६१ धावा केल्या. केएल राहुल आणि अभिषेक पोरेल या दोघांनी दिल्लीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली तर अक्षर पटेल आणि करुण नायर या दोघांनीची चांगली साथ दिली.
अभिषेक पोरल आणि करुण नायर या सलामी जोडीने दिल्लीला आश्वासक सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या. दिल्लीला करुण नायर याच्या रुपात पहिला झटका लागला. करुणने ९ बॉलमध्ये १५ रन्स केल्या. करुणनंतर विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल मैदानात आला. अभिषेक आणि केएल या दोघांनी दिल्लीचा डाव पुढे नेला. या दोघांनी अप्रतिम बॅटिंग केली. अभिषेक पोरल याने अर्धशतक झळकावलं. मात्र अभिषेक अर्धशतकानंतर आऊट झाला. केएल-अभिषेक या जोडीने दुस-या विकेटसाठी ६९ रन्स जोडल्या. अभिषेकने ३६ चेंडूत १ सिक्स आणि ५ फोरसह ५१ रन्स केल्या.
अभिषेकनंतर कर्णधार अक्षर पटेल मैदानात आला. अक्षर आणि केएल या जोडीने दिल्लीला विजयापर्यंत नेले आणि लखनौविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून दिला. अक्षरने २० चेंडूत ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३४ धावा केल्या तर केएलने दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या. केएलने १३५.७१ च्या स्ट्राईक रेटने ३ सिक्स आणि ३ फोरसह ४२ बॉलमध्ये नॉट आऊट ५७ रन्स केल्या तर लखनौकडून एडन मारक्रम याने २ विकेट्स घेतल्या.