22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरलाईट बिलावरून एमएसईबीतील वायरमनच्या हाताला चावा

लाईट बिलावरून एमएसईबीतील वायरमनच्या हाताला चावा

सोलापूर – लाईट बिलावरून एमएससीबीच्या वायरमनच्या हाताला चावा घेऊन सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी एका जनाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना झोपडपट्टी नंबर २८, मड्डी वस्ती भवानी पेठ येथे घडली.

याप्रकरणी उमेश संतराम घोडके (वय- ४३, व्यवसाय एमएसईबी वायरमन, रा. ईश्वर नगर, कुलकर्णी अपार्टमेंट, अक्कलकोट रोड) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून उमेश किसन कसबे यांचा भाडेकरू नाव माहित नाही याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व त्यांच्यासोबत दिनेश कदम असे दोघे मिळून उमेश कसबे यांच्या घरासमोर थकीत लाईट बिल वसुलीच्या कामाकरिता गेल्या असता, वरील संशयित आरोपी यास थकीत लाईट बिल भरले का याबाबत विचारणा केली असता, तुम्ही काय अधिकारी आहेत का? तुम्हाला कशासाठी लाईट बिल दाखवायचे अशी आरेरावीची भाषा वापरून फिर्यादी यांच्या शर्टाची गच्ची धरली.

त्यावेळी फिर्यादी त्यांना सम जावून सांगत असताना फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या जवळच्या बोटाला दाताने चावा घेऊन जखमी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील पोसई बामणे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR