26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रलाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण

लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण

पुणे : पुण्यातील दहिहंडीच्या कार्यक्रमात कुख्यात गुंड गजानन मारणेने मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून सध्या विरोधकांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जात आहे.चंद्रकांत पाटील यांच्या व्हिडीओवर आमदार रोहित पवार यांनी देखील लाडका गुन्हेगार योजना म्हणत राज्य सरकावर टीका केली आहे.

रोहित पवार ट्वीट करत म्हणाले की,मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणे म्हणजे या सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचे लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणा-यांनी हा महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये, असे रोहित पवार यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.

गजा मारणे पुण्यातील कुख्यात गुंड आहे. मारणे गँगचा म्होरक्या अशी त्याची ओळख आहे. तो कोथरूड भागात वास्तव्यास आहे. त्याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR