मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. संजय राऊत यांनी या योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. तसेच काही महिलांनी या योजनेचा चुकीचा फायदा घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान योजनेच्या अर्जांची पुन्हा नव्याने छाननी होणार असल्याची चर्चा आहे मात्र, लाडकी बहीण योजनेचे अर्ज नव्याने छाननी करण्याचे कुठलेच आदेश नसल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे सांगितले जाते. हेच नाहीतर निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींचे आभारही मानले. आता लाडकी बहीण योजनेवरून मोठे राजकारण रंगताना दिसत आहे. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या अगोदर कोणतीही शहानिशा न करता पंधराशे रूपयांचा व्यवहार झाला. राज्याच्या मुख्यमं देखील सांगितले की, निकष बदलावे लागतील. पंधराशे रूपयांमध्ये बहिणींची मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला.
लाडकी बहीण योजनेचा काहींनी चुकीचा फायदा घेतल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले असून तशा तक्रारी आल्याचेही त्यांनी सांगितले. आता याबद्दल आदिती तटकरे यांनी मोठे विधान केलंय. आदिती तटकरे यांनी म्हटले की, लाभार्थी महिलांच्या अर्जाची योग्य छाननी करण्यात आलीये. आता नव्याने कोणत्याही प्रकारची छाननी सरकारकडून करण्यात येणार नाहीये. नव्याने छाननी करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाहीये.
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पुन्हा छाननी होणार असल्याची चर्चा होती. ज्या अर्जांबद्दल तक्रारी आल्या, त्याची छाननी होणार. लाभार्थी नियमानुसार आहेत की नाही याची छाननी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, अशाप्रकारच्या छाननीचा निर्णय सरकारकडून करण्यात आला नाहीये. चांगले उत्पन्न असलेल्या महिला देखील या योजनेचा फायदा घेत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करताना काही अटी लावण्यात आल्या होत्या. लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ३४ लाखांच्या जवळपास अर्ज महिलांनी केली. या योजनेसाठी अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. लाडकी बहीण योजनेचा फायदा राज्यातील महिलांनी मोठ्या संख्येने घेतला. मात्र, या योजनेनंतर राज्यसरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडल्याचे देखील सांगितले जात आहे. याबद्दलच बोलताना संजय राऊत हे दिसले होते. आता परत एकदा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चर्चेत आला आहे.