23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्र'लाडकी बहीण ’ संदर्भात सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी

‘लाडकी बहीण ’ संदर्भात सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी

योजनेच्या गोंधळावर छगन भुजबळ यांची नाराजी

पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारला योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली.

लाडकी बहीण योजनेत सहभाग घेणा-या लाभार्थ्यांनी ठराविक अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून स्पष्ट केले पाहिजे की, योजना सुरू असली तरी त्यासाठी काही अटी महत्त्वाच्या आहेत. जे या अटींची पूर्तता करत नाहीत त्यांनी स्वयंस्फूर्तीने योजना स्वीकारू नये,’’ असे भुजबळ म्हणाले.

त्यांनी योजनेच्या तांत्रिक अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केला. एक मंत्री काही सांगतो, दुसरा काहीतरी वेगळं म्हणतो. मग नक्की काय निर्णय घ्यायचा, हे लोकांना कळत नाही. २५ तारखेला पालकमंत्र्यांनी काही जाहीर केले, त्यानंतर स्थगिती आली. आता पुढे काय होणार, हे सरकारने ठामपणे सांगावे, असे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील गोंधळाबाबत सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR