मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० देण्याचे आश्वासन दिले होते. निडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे श्रेय लाडक्या बहिणींना दिले.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये मिळणार असल्याचे शिंदेंनी जाहीर केले.
दरम्यान,राज्यात लाडकी बहीण योजना सुपर हिट झाली आहे. निवडणुकीत एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्याबळ नाही. असे एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले. हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला आहे. त्यामुळे हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत १५०० नाही तर २१०० रुपये देणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.