37.7 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींना २१००रुपये देता येणार नाही ही वस्तुस्थिती : संजय शिरसाट

लाडक्या बहिणींना २१००रुपये देता येणार नाही ही वस्तुस्थिती : संजय शिरसाट

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना १५०० रुपयांत वाढ करुन २१०० रुपये देण्यात येतील, अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती. मात्र, राज्यात महायुती सरकार येऊन ६ महिने होत आले, त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशनही पार पडलं. मात्र, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच, सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी २१०० रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असे म्हटले. तर, आता मंत्री संजय शिरसाट यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. लाडक्या बहिणींना १५०० चे २१०० देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

राज्यातील सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरुन एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. त्यातच, आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्टच शब्दात लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

राज्याच बजेट अडीच लाख कोटी रुपयांच आहे. सामाजिक न्याय विभागाला साडे एकोणतीशे कोटी मिळायला हवेत. मला २२ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी ३ हजार कोटी विविध योजनेसाठी ७ हजार कोटी दिले आहेत. मला केवळ १५ हजार कोटी रुपये मिळाले, त्यातील ७ हजार कोटी दुस-या योजनेला गेले आहेत. त्यामुळे, मला ३ हजार कोटी रुपये देणे आहे. मुख्यमंर्त्यांना मी लेखी पत्र दिलं आहे, अजित पवार यांना देखील विनंती केली आहे. ११. ८ टक्के रक्कम मला म्हणजेच माझ्या खात्याला देणं गरजेचे आहे, असे म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली.

लाडक्या बहीण बाबत मला फेब्रुवारी मधे फाईल आली होती त्यावेळी मी स्पष्टपणे पैसे देत येणार नाही अस लिहिले होते. लाडक्या बहीण योजनेचे सरकारवर बर्डन आहे. अजित पवार जाणीवपूर्वक करत असतील असं मला वाटत नाही. त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी चुकीच ब्रीफ करत असणार, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आपली नाराजी आणि लाडकी बहीण योजनेबद्दलची वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. १५०० रुपयेची रक्कम २१०० करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे ती मान्य करावी लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR