लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सरकारने गोरगरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यासाठी महाबँकेतील बँक कर्मचारी संघटना स्वयंस्फुर्तीने सरसावल्या आहेत.
एआयबीईए आणि एआयबीओए शी संलग्न असलेल्या बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटना यांनी एकत्रित येऊन बँक व्यवस्थापनास सुट्टीच्या दिवशी बँकेत जाऊन कामे करु त्यासाठी बँक व्यवस्थापनाने सहकार्य करावे, अशी विनंती केली. ही शिल्लक कामे करुन लाडकी बहीण योजेने संदर्भातील उघडावयाचे खाते असोत किंवा आधार, पॅन खात्याला जोडणे, त्याप्रमाणे बँकेच्या रेकॉर्ड वर त्याची (केवायसी) नोंद घेणे यासाठी पुढाकार घेऊन कसल्याही प्रकारचा मोबदला न घेता सुट्टीच्या दिवशी आपापल्या शाखांमध्ये जाऊन बँक ऑफ महाराष्ट्च्या एआयबीईए व एआयबीओए या संघटनेच्या कमर्चारी, अधिकारी यांनी काम केले. संघटनेच्या वतीने राबविण्यात येणा-या या मोहिमेबद्दल बोलताना कॉ. उत्त्तम होळीकर म्हणाले, बँंिकग सेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असला पाहिजे. ही बँक कर्मचारी संघटनेची मागणी आहे.
गोरगरीब जनतेसाठी सुद्धा सदैव तत्परतेने काम करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून गोरगरीब महिला लाभार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सुरु केलेली लाडकी बहीण योजना या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये या योजनेचा सर्वांना वेळेत लाभ मिळावा म्हणून आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमच्या संघटनेच्या सभासदांना सुट्टीच्या दिवशी कसल्याही प्रकारचा मोबदला न घेता बँकेमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची शिल्लक असलेली उघडावयाची खाते उघडणे, त्यांच्या असलेल्या खात्याचे रिकेवायसीसी – केवायसी करणे अशा प्रकारचे कामे करण्यासाठी आवाहन केले.
संघटनेच्या सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला म्हणून दि. १४ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर रोजी बँकांना सुट्टी असूनही आमच्या एआयबीईए आणि एआयबीओए संघटनेच्या सभासदांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या संपूर्ण मराठवाडा विभागातील विविध शाखांमध्ये जाऊन लाडकी बहीण लाभार्थी योजनेची अपु-या कर्मचारी संख्येमुळे जी संबंधित कामे अपूर्ण राहून गेली होती ती पूर्ण केली.