कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन लाडकी बहीण ही योजना घरोघरी पोचवण्यासाठी व्यस्त आहे. पण त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील लाडक्या पूरग्रस्तांना विसरू नये. पूरग्रस्तांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी बोचरी टीका माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली.
पूरग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान त्यांनी कोल्हापुरात हे वक्तव्य केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर सध्या ओसरत असला तरी अनेक भागाचे नुकसान झाले आहे.
हजारो हेक्टरमधील शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या पात्राबाहेर पडल्याने अनेकांची घरे पाण्यात बुडाली आहेत. या परिस्थितीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.