27.2 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्र‘लाडक्या बहिणी’साठी पुरुषांचे अर्ज!

‘लाडक्या बहिणी’साठी पुरुषांचे अर्ज!

डल्ला मारण्याचा प्रयत्न करणा-या सहा जणांचे आधारकार्ड निलंबित

अकोला : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना मिळाला आहे. या योजनेची नोंदणी अद्यापही सुरूच आहे. मात्र, अकोल्यात या योजनेसाठी ६ भावांनी अर्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या ६ जणांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा केल्याचे तपासात आढळून आले आहे. या सहा जणांवर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

‘लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबर रोजी मिळणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या योजनेत सहा पुरुषांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली. सहाही जण अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असून त्यांनी त्यांचे आधार कार्ड ‘नारीशक्ती दूत’ अ‍ॅपवर अपलोड करून खोटी माहिती भरल्याचे दिसून आले.

महिला व बालकल्याण विभाग, तसेच महानगरपालिका यांच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. या सहा जणांना खुलासा सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले.
दोषींकडून खुलासा मागितला
लाडकी बहीण योजनेत खोटी माहिती देणा-या सहा जणांचे आधारकार्ड महिला आणि बालकल्याण विभागाने निलंबित केले आहे. या सहा पुरुषांना यापुढे त्यांच्या आधारकार्डद्वारे कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच त्यांच्याकडून या प्रकाराबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे, अशी माहिती अकोला जिल्हा माहिती आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR