‘लाडू’तून रेखाटले कौटुंबिक पातळीवरील मनोव्यवहार 

लातूर : प्रतिनिधी
६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पधेच्या लातूर केंद्रावरील स्पर्धेचे उद्घाटन दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाले. उद्घाटनानंतर उन्नती फाउंडेशन लातूर या संस्थेने डॉ समीर मोने लिखित आणि सुवर्णा बुरांडे दिग्दर्शित ‘लाडू’ हे कौटुंबिक पातळीवरील मनोव्यवहाराचे रेखाटन करणारे नाटक अप्रतिम रित्या सादर केले.
विधवा आई, लग्नाचं वय उलटून गेलेली तिची मुलगी यांच्या मनातील द्वंद्व या नाटकातून मनोविश्लेषणात्मक पातळीवर लेखकाने अधोरेखित केले आहे. एकीकडे माया, ममता, वात्सल्य आणि दुस-या टोकाला कमालीचा विखार, दुजाभाव आणि यातून उद्भवणारा मायलेकीचा जगावेगळा संघर्ष. भ्रमाच्या भोव-यात अडकलेले आयुष्य आणि या भासमान पडद्याआड दबा धरून बसलेले भीषण वास्तव.  भूत आणि वर्तमानाच्या हिंदोळ्यावर झुलत मानवी मनाच्या अथांग डोहाचा तळ शोधू पाहणारी ही भावस्पर्श कथा. दिग्दर्शिका सुवर्णा बुरांडे यांनी या कथानाकाचा पोत लक्षात घेऊन सूक्ष्म बारकावे शोधत या नाटकाला खूप अभ्यासपूर्ण आकार दिला आहे. अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी केलेली यशस्वी घोडदौड कौतुकास्पद आहे. याच नाटकातील आईची मुख्य भूमिका त्यांनी समर्थपणे उभी केली आहे.
मंजुषा पाठक यांनी अंजू ही खूप वैविध्यपूर्ण आयाम असलेली लेकीची भूमिका अगदी समरसून केली आहे. तेजश्री पाटील यांची शांता खूप भाव खाऊन गेली. गुलाब झालेल्या नम्रता पाठक यांनी आपल्या अभिनयाने नाट्य रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. गणेश मरोड यांची प्रकाश योजना ही तर नाटकाचा आत्मा म्हणावा इतकी अर्थपूर्ण आणि कलात्मक झाली. रवी आघाव आणि सलीम पठाण यांचे नेपथ्य खूप विचारपूर्वक केलेले होते.  ऋतुराज सुरवसे यांनी आपल्या पार्श्वसंगीतच्या माध्यमातून नाटकाला उंचीवर नेण्याचे महत्त्वाचे काम केले. रुक्मिणी मुंडे आणि आशा गोडभरले यांनी वेशभूषा उत्तमपणे सांभाळली. दिवाळीत भरपेट लाडू खाऊनही दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारा हा ‘लाडू ‘ मात्र लातूरच्या नाट्यरसिकांना अधिक लज्जतदार वाटला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | माहूरमध्ये ८३ किलो गांजा जप्त; ४१.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ११८ झाडे उद्ध्वस्त
02:27
Video thumbnail
Latur News |आमदार अमित देशमुखांच्या हस्ते किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे उद्घाटन
09:08
Video thumbnail
Latur News | पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर मनपाची कारवाई; २५ जणांना दंड, २६७ जणांना नोटिसा
02:05
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42

Latest news