27.8 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरलातुरात आढळले जी. बी. सिंड्रोमचे दोन संशयीत रुग्ण

लातुरात आढळले जी. बी. सिंड्रोमचे दोन संशयीत रुग्ण

लातूर : प्रतिनिधी
पुणे येथे जी. बी. सिंड्रोमचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण असताना लातूर जिल्ह्यात जी. बी. सिंड्रोमचे दोन संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुण्यालयात विशेष कक्षामध्ये  उपचार केले जात असुन दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लातूर जिल्ह्यातून ८८ वर्षांचा एक पुरुष रुग्ण व ४५ वर्षाची महिला रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुण्यालयात दाखल झाले. या दोन्ही रुग्णामध्ये जी. बी. सिंड्रोमची लक्षणे दिसून आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तात्काळ विशेष कक्षात भरती करुन उपचार सुरु केले आहेत. दरम्यान दोन्ही रुग्णांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. परंतू, अद्याप चाचणी अहवाल प्राप्त झाला नसल्याने हे रुग्ण जी. बी. सिंड्रोमने बाधित आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतू, या रुग्णांमध्ये जी. बी. सिंड्रोमची लक्षण दिसत असल्याने त्यांना विशेष कक्षात भरती करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. सर्व प्रकारची औषधे, लसी उपलब्ध असल्याची माहितीही रुग्णालय प्रशासनाने दिली.
दरम्यान लातूर मनपाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी घाबरुन जाता काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीला अनुसरून- लातूर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली या आजाराचा प्रतिबंध व उपचारात्मक उपाययोजनाविषयाची  महानगरपालिकेत बैठक झाली.
जी. बी. सिंड्रोम हा संसर्गमुळे होणारा आजार असून, हा संसर्ग दूषित अन्न किंवा पाणी पिल्याने होतो. त्यानंतर हा बॅक्टेरिया व्यक्तीमधील रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. डेंग्यू, चिकनगुनिया किंवा इतर बॅक्टेरियासह इतर विषाणू सारखा संक्रमणामुळे होणारा हा जी. बी. सिंड्रोम आजार आहे. या आजाराचे  प्रमाण एक लाख लोकसंख्खेमागे एक  रुग्ण असे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR