29.7 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeलातूरलातुरात पुन्हा एकाचा दगडाने ठेचून खून

लातुरात पुन्हा एकाचा दगडाने ठेचून खून

लातूर :  प्रतिनिधी
शहरांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून सोमवार दि. २४ मार्च रोजी पहाटे राज्यस्थान विद्यालयाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या गाळ्याच्या पोर्चमध्ये केवळ ११०० रूपयाच्या देवाणघेवाणीतून एका तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. लातूर शहरात गेल्या काही दिवसात रस्त्यावर, रसत्याच्या कडेवर झोपलेल्यांचा या ना त्या कारणाने ठेचून खून करण्याचे प्रकार वाढले आहेत.
मागील आठवड्यात भिक मागून जगणारा एका इसमाचा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. आज राजस्थान विद्यालयाच्या शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या एका गाळ्याच्या पोर्चमध्ये अक्षय राम तेलंगे रा. गोपाळनगर लातूर या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून करण्यात आला आहे.
अक्षयचा चेहरा पूर्णपणे दगडांनी ठेचून चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता. अक्षय तेलंगे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून समजते आहे. त्याच्यावरती चोरी मारहाण व दरोडा यासारखे गंभीर गुन्हे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये नोंद असल्याचे समजते. हा खून केवळ ११०० रुपयाच्या देवाणघेवाणीतून झाल्याच्या प्राथमिक माहीतीतून समोर येत आहे. याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक करत आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू सुरू होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR