लातूर : प्रतिनिधी
विश्वशांतीचे अग्रदूत, महामानव तथागत भगवान बुद्ध यांची जगभरात जयंती साजरी होत असताना. लातूर शहरामध्येदेखील बुद्ध जयंती निमित्त बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व सर्व उपासक-उपासिकांच्या च्या संयुक्त विद्यमाने भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शना खाली बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काढलेल्या धम्म मिरवणूकने सर्वांचे लक्ष वेधले.
प्रारंभी नांदेड रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विविध नगरातील समाजातील ज्येष्ठ भगिनींच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करुन भगवान बुद्ध मूर्तीसहित भिक्खू संघ, श्रामणेर संघ, उपासक उपासिकांसह भव्य धम्म मिरवणूकिस प्रारंभ करण्यात आला. या धम्म मिरवणुकीत श्रामणेर संघ, उपासक-उपासिका, तरुण वर्ग, महिला मंडळे, शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वजण पांढ-या व वस्त्रधारी पोशाखात आणि हातात पंचरंगी धम्मध्वज घेऊन चालत होते. या उपक्रमांमुळे धम्म मिरवणूक एक चलतं-फिरतं बौद्ध शिक्षण केंद्र वाटत होते.
या भव्य धम्म मिरवणुकीमुळे समाजात बौद्ध धम्माचे मूल्य आणि भगवान बुद्धांनी दिलेले शांती व समतेचे संदेश पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये जागृत झाले. भगवान बुद्धांच्या जयंती निमित्त निघालेली ही धम्म मिरवणूक केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती सामाजिक परिवर्तनाचा एक सशक्त माध्यम ठरते. अशा मिरवणुकींमधून नव्या पिढीला बौद्ध धम्माचे विचार व मूल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा मिळते.
तद्दनंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भिक्खू पय्यानंद थेरो सुशीलकुमार चिकटे, डॉ. विजय अजनिकर, संजय सोनकांबळे, अॅड. रमक जोगदंड, मिलिंद धावारे, आशा चिकटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून, तथा भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या हस्ते मुख्य धम्म ध्वजारोहन करून, त्रिसरण पंचशीला सह, धम्म ध्वज गाथेने या भव्य दिव्य धम्म मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
या वेळी प्रा. अनंत लांडगे, डी. एस. नरसिंगे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे,प्राचार्य डॉ. संजय गवई,पृथ्वीराज शिरसाठ,पांडुरंग अंबुलगेकर,केशव कांबळे,डॉ. विजय अजनिकर, लाला सुरवसे, भीमराव चौदंते, करण ओव्हाळ, डॉ. अरुण कांबळे, अॅड. गणेश कांबळे, राहुल शाक्यमूणी, अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, ज्योतीराम लामतुरे, कुमार सोनकांबळे, विजय चौधरी,बालाजी कांबळे.वैभव गायकवाड,आकाश सरवदे, डॉ. अरुण कांबळे, रुपेश गायकवाड, नितीन पडसाळे, सिद्धार्थ सूर्यवंशी, विनोद कोल्हे,शिला वाघमारे,निर्मला थोटे, पंचशीला बनसोडे,स्वाती सूर्यवंशी, शारदा लामतुरे, बेबीताई कांबळे, शकुंतला नेत्रगावकर, सरिता बनसोडे, कविता धावारे, प्रतिष्ठित मान्यवर, डॉक्टर, वकील, विविध महिला मंडळे, विद्यार्थी विद्यार्थिनीसह हजारो उपासक उपासिकांची उपस्थिती होती.