27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलातुरात रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव

लातुरात रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव

लातूर : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा आयुक्त कार्यालय, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालय, लातूर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ७ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृह व जिल्हा क्रीडा संकुलाच्या इनडोअर हॉल येथे हा युवा महोत्सव होईल.
युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्­त कला गुणांना वाव देणे व त्यांना एक खुले व्यासपीठ करण्याच्या हेतूने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे, युवकांना विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणे, शिक्षण, उद्योग-व्यवसाय यासोबतच शेती या व्यवसायासी युवकांची ओळख करुन देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्व युवकांना पटवूण देणे, हा युवा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यातील सांस्कृतिक कला प्रकारात समूह लोकनृत्य (सहभाग संख्या १०), कौशल्य विकास प्रकारात कथा लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, संकल्पना आधारीत स्पर्धा, विज्ञान व तंत्रज्ञान यातील नवसंकल्पना आधारीत विज्ञान प्रदर्शन होणार आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये लातूर जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती सहभाग घेऊ शकतात. यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, संगीत अकॅडमी, महिला मंडळ, महिला बचत गट, युवकांसाठी कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) इत्यादी संस्थेतील युवक व युवती यांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकारासाठी विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटात असलेल्या पाच युवकांची नावे विभाग स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच विभाग स्तरावरुन पाच युवकांची नावे राज्य स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार असून राज्य स्तरावरुन एकुण १० युवकांना राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येणा-या संघामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR