लातूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून जेवणानंतर सुपारीचा एखादा तुकडा तोंडात टाकण्याचे प्रमाण होते. मात्र कालानंतराने लहान-मोठ्या व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात सुपारीची मागणीत वाढ झाली. सध्या जिल्ह्यातील युवकांसह वयोवध्द मंडळींकडून सुपारीचा शौक भारी, असे म्हणायची वेळ आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरासह ग्रामीण भागातील युवकात सुगंधी तंबाखूमिश्रित सुपारी, गुटखा खाणा-याचे प्रमाण एवढे वाढले आहे कि, आज घडली लातूर शहरातील बाजारपेठेत दररोज तब्बल ३ ते ४ क्विंटल सुपारीची गरज भासत आहे. लातूरकरांच्या मागणी नुसार सुपारीची उलाढाल पाहता दिवसाची सरासरी ही जवळपास दोन कोटी ५० लाख रुपयांची रूपयांची असल्याचे व्यापा-यांनी सागीतले. एवढी सुपारी फोडायची कशी, असा प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर लातूरकरांनी शोधून ठेवले आहे. सुपारी फोडण्याची पुरेशी यंत्रे लातूरमध्ये आहेत. पूर्वी चव बदल म्हणून तोंडात टाकायची सुपारी सध्या अनेकांची गरज झाली असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी जेवणानंतर बडीशेप, सुपारी खाण्याची पूर्वापार पद्धत होती. घरामध्ये पाहूण्यासाठी सुपारी खाल्ली जायची. आता ही सुपारी जवळपास सर्वांचीच गरज झाली आहे. शहरातील बाजारपेठेत येणारी सुपारी ही कर्नाटक प्रांतातील मेंगलोर येथून मोठया प्रमाणावर सुपारीची आवक होते. जिल्ह्याभरात खाली जाणा-या सुपारीचे सुमारे ४० ते ५० प्रकार आहेत. यातून जिल्ह्यातील बाजारात छाली, छाली भाजकी, खडा, भाजकी खडा आदी या सुपारीला मोठी मागणी असून त्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
सध्या जवळपास पाच हजार वस्तीच्या एका गावामध्ये किमान एक क्विंटल सुपारी विकली जाते. लातूर जिल्ह्यात मतदार संख्या २३ लाख आहे. केवळ मतदारांची संख्या सुपारी खाणारी गृहीत धरली, तरी ५०० क्विंटल सुपारी खपते. सध्या बाजारात सुपारीचा भाव ५०० ते ५६० रुपयापर्यंत आहे. पान टपरीवर गुटखामिश्रित सुपारी घासून मिळण्याचे प्रमाण सर्रास आहे. त्याकडेही लोकांचा कल अधिक आहे. गुटख्यावर बंदी असली, तरी अशा सुपारीसाठी लागणारे सर्व रासायनिक पदार्थ मात्र उपलब्ध होतात.