24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरलातूरकर धावले आरोग्यासाठी अन् समानतेसाठी

लातूरकर धावले आरोग्यासाठी अन् समानतेसाठी

लातूर : प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आयएमएथॉन लातूर २०२४ मॅरेथॉन स्पर्धेस रविवारी उस्फूर्त प्रतिसाद लाभला. ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, १०किलोमीटर व २१ किलोमीटर साठी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १५०० पेक्षा जास्त धावपटूंनी उत्साहाने व हिरीरीने सहभाग नोंदविला. आयएमएथॉन लातूर २०२४ च्या चवथ्या आवृत्तीची जय्यत तयारी करण्यात आली होती. आयएमए लातूरच्या वतीने ह्या मॅरेथॉनची थीम ‘तीला सक्षम करा, सर्वांना उन्नत करा, प्रत्येक टप्प्यावर समानतेसाठी धावा!’, अशी ठेवण्यात आलेली होती. ८ मार्च रोजी होणा-या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्त्तीचे सक्षमीकरण आणि समानता अशी थीम आयोजकांनी विचारपूर्वक निवडलेली होती.

२१ किलोमीटर व १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे व स्पर्धेचे मुख्य प्रायोजक लातूर अर्बन को-ऑ. बँक लि., लातूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी, अतिरिक्त्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या हस्ते करण्यात आली. बिडवे लॉन्स, औसा रोड येथून सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये २१ किलोमीटर साठी २४० व दहा किलोमीटर साठी ६५० धावपटूंनी सहभाग नोंदवला. ५ किलोमीटर व ३ किलोमीटर च्या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व मॅरेथॉन स्पर्धेचे सहप्रायोजक असलेले सुभाष कासले, क्वॉलिटेक इलेव्हेटर्स, भारती व गित्ते ग्रुपचे धर्मवीर भारती व नागनाथ गित्ते, कौशल्या अकॅडमी लातूरचे पाटील, कीर्ती गोल्डचे भुतडा, सनरिच अ‍ॅक्वाचे मुंदडा, हॉटेल सिटी सेंटरचे नंदकिशोर अग्रवाल, हॉटेल भोजचे मिनू अग्रवाल, बिडवे लॉन्सचे गणेश बिडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व धावपटूंनी स्पर्धा सुरु होण्याअगोदर एकत्र येऊन अंकिता जोधवानी यांच्या नेतृत्वाखाली झुंबा करत वॉर्म अप केला. त्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साह संचारला. फ्लॅग ऑफ झाल्यानंतर चढाओढीने धावत लवकरात लवकर स्पर्धा पूर्ण करण्याची लगबग दिसून येत होती. बक्षीस वितरण सोहळयासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेचे सूत्रसंचालन समीर बजाज व डॉ. आशिष चेपुरे यांनी केले. खुल्या गटामध्ये ३ किमी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये आर्यन नागरगोजे, अविनाश कांडगिरे , अथर्व अर्जुने व मुलींमध्ये जननी शिंदे, सानवी वाघमारे, कैरा नावंदर यांनी अनुक्रमे प्रथम दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. साठ वर्षांवरील स्पर्धकांमध्ये पुरुष गटात लाल मोहम्मद उजेडे, सुरेश भुतडा, सुभाष मल्लाडे व स्त्री गटामध्ये कुसुम पाटील, डॉक्टर सरिता मंत्री व शकुंतला रेड्डी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावला.

पाच किलोमीटर स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये पुरुषांमध्ये शुभम भोसले, आदित्य पोटले, आरुष यादव व महिला गटामध्ये राजनंदिनी सोमवंशी, ऋतूजा सोनी, आदिती थोरमोठे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. पाच किलोमीटर डॉक्टर गटामध्ये पुरुषांमध्ये पार्थ खानापूरकर, डॉक्टर राहुल सूळ, डॉक्टर दीपक पाटील यांनी तर स्त्री गटामध्ये अनन्या पांचाळ, डॉक्टर शीतल अभंगे व तनिष्का पाटील यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. दहा किलोमीटर खुल्या गटामध्ये पुरुषांच्या गटात निवृत्ती गुडेवार रितेश धोत्रे व गौरव कांबळे व स्त्री गटामध्ये दिव्या राठोड, निकिता म्हात्रे व श्रावणी जगताप यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. दहा किलोमीटर डॉक्टर्स व कुटुंबीय या गटामध्ये डॉक्टर मुरलीधर जाधव, डॉक्टर अमृत शिवडे, डॉक्टर सचिन बाबळसुरे तर महिला गटामध्ये डॉ. वैशाली कुलकर्णी डॉक्टर क्रांती साबदे, डॉक्टर रचना जाजू यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

२१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये खरोखर चुरस बघायला मिळाली. खुला गटातून गणेश सुरवसे वैभव कांबळे व गंगाधर सोमवंशी व स्त्री गटातून पुष्पा राठोड, परिमला बाबर व राणी लोया यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. २१ किलोमीटर डॉक्टर्स गटामधून पुरुषांमध्ये डॉ. दिनकर बिरादार, डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. महेश कदम तर महिला गटामधून डॉ. वृषाली बंडगर, डॉ. वैशाली इंगोले, डॉ. रचना बियाणी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हातभार लावणा-या सर्वांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आयएमएथॉन लातूर २०२४ च्या यशासाठी लातूरचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपुरे, वूमेन्स ंिवगच्या अध्यक्षा डॉ. प्रिती बादाडे, सचिव डॉ. प्रियंका राठोड, उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, डॉ. हर्षवर्धन राऊत, कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे, डॉ. आरती झंवर, डॉ. चांद पटेल, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. अजय जाधव, डॉ. चेतन सारडा, डॉ. विक्रम सारडा, डॉ. शितल ठाकूर-टीके, डॉ. सतीश हंडरगुळे, डॉ. चंद्रशेखर अष्टेकर, डॉ. ज्योती सूळ, डॉ. केतकी चवंडा यांसह सर्व आयएमए पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR