17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरलातूरचे गतवैभव प्राप्त करून घेण्यासाठी अमित देशमुख यांना आशिर्वाद द्या 

लातूरचे गतवैभव प्राप्त करून घेण्यासाठी अमित देशमुख यांना आशिर्वाद द्या 

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात जनतेची दिशाभूल करत सर्व समाजाला फसवले. सर्वधर्म समभाव, सामाजिक सलोखा निर्माण करणारा काँग्रेस पक्षाचा विचार संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे  विचार, ध्येय, धोरण स्वीकारले असून यांच्या विचारा शिवाय समाजातील लोकांचें कल्याण होणार नाही. सर्वधर्म समभाव असलेल्या काँग्रेसला साथ देवुन लातूरच्या विकासासाठी, गतवैभव प्राप्त करुन घेण्यासाठी अमित देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर शहर मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये आयोजित संवाद बैठकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, माजी नगरसेवक सचिन  बंडापल्ले, प्रा. अनंत लांडगे, रामभाऊ चलवाड, उस्मान गुरुजी, वसंतराव पाटील, सलीम गोलंदाज, शिवसेना उद्धव बाळासहोब ठाकरे पक्षाचे प्रदीप बनसोडे,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचं्रद पवार पक्षाचे मोहीन शेख, काँग्रेस मीडिया प्रमुख हरिराम कुलकर्णी, निजाम शेख, भाऊसाहेब भडीकर, शैलेश बोईनवाड, युवक काँग्रेसचे इम्रान सय्यद, एस. टी. चांदेगावकर, राजकुमार माने, शीलाताई वाघमारे, अ‍ॅड. अंगद गायकवाड, राज क्षीरसागर, शामराव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पण त्यांच्या हातात काहीच नाही. ते अनाथ असून राज्याची सूत्रे दुस-यांच्या हातात आहेत, असे नमुद करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणलो, आज राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण सरकारमधील लोकांना वेळच नाही भूलथापा देऊन लोकांची दिशाभूल करणारी मंडळी सत्तेत बसलेली आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले दलीत अल्पसंख्याक समाज बांधव एकत्रित येऊन या सरकारला सत्तेवरून पायउतार करावे. यासाठी आपल्याला योग्य वेळ आलेली आहे. शहरात सर्वसामान्य लोकांना लोकनेते विलासराव देशमुख यांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सुधा मांजरा साखर परिवाराच्या माध्यमातून लोकांना आधार रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केल. शेतकरी असेल व्यापारी असेल गोरगरीब जनतेसाठी आम्ही आमचे दरवाजे खुले आहेत.
जितकं शक्य असेल तिथे आम्ही विकासासाठी मदत केली आहे भविष्यात आपल्याला शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेसला आशिर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महिला पुरुष जेष्ठ नागरिक युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार रामभाऊ चलवाड यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR