विवाह समारंभात वधु-वरांनी उपस्थितांसह केला मतदानाचा संकल्प

लातूर : प्रतिनिधी
२३४ लातूर ग्रामीण विधासभा मतदार संघात स्विपच्या वतीने  वधु वैष्णवी वर विशाल यांच्या शुभ विवाह प्रसंगी लातूर ग्रामीणच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसिलदार मंजूषा भगत यांच्या प्रमूख उपस्थितीत विवाह समारंभास उपस्थित मतदारांना मतदान करण्यासाठी स्वीप समन्वयक मंगेश सुवर्णकार, अमृत स्वामी यांनी शपथ देऊन १०० टक्के मतदान करण्यासाठी आवाहन केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घूगे यांच्या मार्गदर्शनाखाली २३४ लातूर ग्रामीण विधान सभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्विपच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत दिपज्योती नगर येथे संगमेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या शिंदे व रकटाटे परिवाराच्या विवाह समारंभ प्रसंगी व ग्यानदेव मंगल कार्यालयातील शिलेदार परिवाराच्या आशिष व रोहिनी यांच्या विवाह प्रसंगी रेणापूर तालुक्याच्या तहसिलदार तथा साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजूषा भगत व स्विप टिमच्या उपस्थितीत मतदार जागृती करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी डॉ. मारुती सलगर, स्वीप समन्वयक मंगेश सुवर्णकार, धनराज गिते, विजय माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.  याप्रसंगी अमृत स्वामी, हनमंत भाशिंगे, महादेव बन, सुरेखा चंदेले  यांची उपस्थिती होती. अमृत स्वामी यांनी मतदारांना मतदानाची प्रतिज्ञा  दिली व मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी २० नोव्हेंबरला मी मतदान करणारच असे स्टीकर हातात घेऊन मतदान करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक मतदार या प्रसंगी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news