24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरलातूरच्या दिव्यांग खेडाळूच्या संघाला सहा पदके 

लातूरच्या दिव्यांग खेडाळूच्या संघाला सहा पदके 

लातूर : प्रतिनिधी
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या स्पेशल ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या दिव्यांग संघाने ३ सुवर्ण पदके, २ रौप्य पदके,्र १ कास्य पदक असे एकूण ६ पदके पटकावली आहेत. बौध्दीक असक्षम असणा-या या दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैयक्तीक व सांघीक क्रीडा प्रकारात लातूर जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करीत ६ पदके पटकावली आहेत.
यात संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, लातूर व मतिमंद विद्यालय लातूर या शाळेतील ११ खेळाडूंचा सहभाग होता. यात रवि कवटे यांने गोळा फेक, राजू पवार ने वेटलिप्टींग, तर हरिष पुरी यांने स्पॉटजंप प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. यासह यश गिरीने भालाफेक, व ऊसबअली शेखने व्हॉलीबॉल खेळात रौप्य पदक पटकावले आहे. यासह टेबल टेनीस क्रीडा प्रकारात विठ्ठल भोरे यांने कास्यपदक मिळवीले आहे. लातूर जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंच्या चमुने या राज्य स्पर्धेत ६ पदके पटकावित यश मिळवीले आहेत. सुवर्णपदक प्राप्त खेळाडूची स्पेशल ऑलंम्पिक राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून तुकाराम शिरसाठ, शिवदास लोखंडे, अतुल बेडके यांनी काम पाहिले आहे.
या यशस्वी खेडाळूचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, सक्षम जिल्हा सचिव बस्वराज पैके, संस्था अध्यक्ष अण्णासाहेब कदम, मुख्याध्यापक शिवप्रसाद भंडारी, कार्यालयीन अधिक्षक राम वंगाटे, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR