16.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeलातूरलातूरच्या शेतक-यांच्या घरावर बीडचा दरोडा

लातूरच्या शेतक-यांच्या घरावर बीडचा दरोडा

लातूर : प्रतिनिधी
पीक विमा भरण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. शेत जमीन लातूरची पीक विमा भरणारा शेतकरी बीडचा. त्याला अकाउंट जोडले बीडच्या शेतक-याचे लातूरच्या शेतक-याला मदत मिळणार कशी? लातूर जिल्ह्याच्या शेतक-यांच्या घरावर बीड जिल्ह्यातील शेतक-यांचा दरोडा टाकण्याचा प्रकार घडल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतक-यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
एक रुपयामध्ये पीक विमा. पंतप्रधान पीक विमा जेव्हापासून सुरु झाला त्या वेळेपासून बीड जिल्ह्यामधील विशेष करुन परळी येथील काही शेतक-यांनी लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, जालना, अशा एकूण २०-२५ ठिकाणी एकाच शेतक-याने पीक विमा भरल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन-चार वर्षांपासून शेतकरी आपल्याला पीक विमा मिळत नाही म्हणून स्वस्थ बसले. शेतक-यांना आपल्या नावावर बीड जिल्ह्यातील लोकांनी विमा भरल्याचे लक्षात आले नाही. यावर्षी हा प्रकार उघडकीस आला आहे. याचा परिणाम असा झाला की, गेल्या दोन-चार वर्षापासून लातूर जिल्ह्यामधील व संबंधित  जिल्ह्यांतील सर्व शेतक-यांना खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
गेल्या वर्षी निलंगा तालुक्यामधील शेतक-यांच्या जमिनीवर परळी येथील शेतक-यांनी पीक विमा भरल्याचे उघड झाले. तेव्हा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लातूरच्या शेतक-यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. सखोल चौकशी होईल, असेही सांगितले. दोषीवर कार्यवाही होईल. परंतु, यापैकी काहीही झाले नाही. गेल्या हंगामामध्ये जर दोषींवर कठोर कार्यवाही झाली असती तर लातूर जिल्ह्यातील व भोवतालच्या सर्व जिल्ह्यांमधील शेतक-यांना पीक विमा लाभांपासून वंचित राहावे लागले नसते.
येत्या आठ दिवसाच्या आत नुकसानग्रस्त, अन्यायग्रस्त शेतक-यांना त्यांच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा कराव्यात. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संबंधित जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनाची सुरुवात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये लातूरमधून करण्यात येईल. जोपर्यंत शेतक-यांना न्याय मिळत नाही व त्यांच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे, असे क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR