36.1 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeलातूरलातूरातील २८ कॉफी शॉप मालकांवर कारवाई

लातूरातील २८ कॉफी शॉप मालकांवर कारवाई

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील कॉफी शॉप मालका विरोधात दिनांक ९ एप्रिल रोजी लातूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यात शहरातील २८ कॉफी शॉप मालकांवर कारवाई करण्यात आली. कॉफी शॉप मालकांनी त्यांचे शॉपमध्ये बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करीत असल्याचे निदर्शनास आल्याने  पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे  मार्गदर्शनात लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांचे नेतृत्वात लातूर शहरातील चार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व त्यांचे पथकाने लातूर शहरातील विविध  कॉफी शॉपवर अचानक भेट देऊन  नियमांचे उल्लंघन करणा-यावर दिनांक ९ एप्रिल रोजी लातूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.
कारवाईत २८ कॉफी शॉप ना भेटी देऊन त्यातील ३ कॉफी शॉप मधील बंदिस्त कंपार्टमेंट त्यांचे चालका मार्फत तोडण्यात आले. तसेच १० कॉपी चालक धारकांना भारतीय न्याय सुरक्षा संहिता २०२३ कलम १६८ प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली आहे. ज्या आस्थापनाधारकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR