लातूर : सिध्देश्वर दाताळ
गर्दीच्या काळात लालपरीने प्रवास करणा-या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ जानेवारी २०२४ पासून बस तिकीटासाठी ऑनलाईन आरक्षन प्रणाली सुरू केली आहे. या आरक्षण प्रणालीला लातूर जिल्ह्यातील प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून १ जानेवारी ते २७ मे २०२४ पर्यतच्या कालावधीत लातूर आगारातून ८ हजार ५९६ तिकीटांची ऑनलाईन विक्री झाली आहे. यातून लातूर आगाराला तब्बल ४८ लाख १२ हजार ११५ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षाच्या तूलनेत यंदा काही प्रमाणात वाढ झाली आहे.
एसटी महामंडळाची आरक्षण सुविधा गेल्या सात वर्षांपासून सुरू होती, मात्र त्यात अनेकदा सर्व्हर डाऊन किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना ऑनलाईन आरक्षण करणे कठीण जात होते. त्याची दखल घेत एसटी महामंडळाने नवीन आरक्षण प्रणाली १ जानेवारीपासून सुरू केली. या आरक्षण प्रणालीस सर्व बसस्थानक जोडली आहेत. त्यात रोजचे बसचे वेळापत्रक, बसचा प्रकार व कोणत्या गावाहून कोणत्या गावाला, किती बस, किती वाजता सुटते आदी तपशील आहेत. त्यानुसार ऑनलाईन सेवेव्दारे प्रवाशांना तिकीट काढता येते. त्यामुळे आता घरबसल्या प्रवाशांना आरक्षण सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवेव्दारे तिकीट आरक्षण करणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एसटीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईल वर टरफळउ इ४२ फी२ी१५ं३्रङ्मल्ल अॅपच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारीपासून बदल करीत अद्यावतीकरण करण्यात आले. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मूलन झाल्याने ही ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखिल आगाऊ आरक्षण मिळु शकते. त्यासाठी महामंडळाने अधिकृत संकेतस्तळाबरोबर टरफळउ इ४२ फी२ी१५ं३्रङ्मल्ल अॅपचा वापर प्रवशी वर्गानी करावा असे अवाहन करण्यात आले आहे.